जिल्ह्यात १७ सरपंच अविरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:59 AM2017-09-29T01:59:54+5:302017-09-29T02:00:11+5:30
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर (बुधवारी) जिल्हय़ात १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली असून, ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर (बुधवारी) जिल्हय़ात १७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली असून, ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात पाच वर्षांचा कालावधी संपणार्या २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीपर्यंत सरपंच पदांसाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज नसल्याने आणि प्रत्येकी एकच अर्ज दाखल असल्याने, जिल्ह्यात १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी १७ उमेदवारांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. तसेच ७७७ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली.
१७ उमेदवारांची सरपंच पदांसाठी अविरोध निवड घोषित करण्यात आल्याने, जिल्ह्यातील २७२ पैकी २५५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच २ हजार ११८ ग्रामपंचायत सदस्य पदांपैकी ७७७ उमेदवारांची सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आल्याने, उर्वरित १ हजार ३४१ सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
अविरोध निवड झालेले
असे आहेत ग्रा.पं. सदस्य!
जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ७७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात -९५, अकोट-८७, मूर्तिजापूर -१७४, अकोला -१४३, बाळापूर-५0, बाश्रीटाकळी - १५५ व पातूर तालुक्यात ७३ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली.