डेंग्यूने घेतला १७२ रुग्णांचा बळी
By admin | Published: September 15, 2014 01:02 AM2014-09-15T01:02:42+5:302014-09-15T01:15:25+5:30
राज्यात सहा वर्षात १५ हजार ६३७ रुग्ण डेंग्यूने बाधित
ब्रह्मनंद जाधव / मेहकर
डेंग्यूसदृश तापाने राज्यभर थैमान घातले असून, सहा वर्षात तब्बल १५ हजार ६३७ रुग्णांना डेंग्यूने ग्रासले. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला. आता डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, हा जीवघेणा आजार रोखणे हे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान ठरत आहे.
राज्यात २00९ पासून डेंग्यूच्या विषाणूचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. घरात साठवलेल्या पाण्यामध्ये तसेच घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. प्रामुख्याने चार प्रकारच्या डेंग्यूचे विषाणू आढळतात. त्याला डेंग्यू एक, दोन, तीन व चार असे संबोधले जाते. सद्य:स्थितीत डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखानेही हाऊसफुल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूसदृश तापाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
२00९ पासून डेंग्यूने राज्यभर हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, गत सहा वर्षात १५ हजार ६३७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
वर्ष रूग्ण मृत्यू
२00९ २२५५ २0
२0१0 १४९८ 0५
२0११ ११३८ २५
२0१२ २९३१ ५९
२0१३ ५४३२ ४८
२0१४ २३९२ १५