'MPSC'च्या परिक्षेला १७४३ उमेदवार गैरहजर! अकोल्यातील ३१ केंद्रांवर ६७१२ उमेदवारांनी दिली परीक्षा
By संतोष येलकर | Published: October 8, 2022 06:58 PM2022-10-08T18:58:29+5:302022-10-08T18:58:39+5:30
अकोला जिल्ह्यात 'MPSC'च्या परिक्षेला १७४३ उमेदवार गैरहजर हजर होते.
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शनिवार, ८ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील ३१ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परिक्षेत ६ हजार ७१२ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, १ हजार ७४३ उमेदवार या परिक्षेला गैरहजर होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षेसाठी ८ हजार ४५५ उमेदवार प्रविष्ट होते.
जिल्हा मुख्यालय अकोला शहरातील ३१ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परिक्षेत एकूण प्रविष्ट उमेदवारांपैकी ६ हजार ७१२ उमेदवारांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली असून, उर्वरित १ हजार ७१२ उमेदवार परिक्षेला अनुपस्थित होते. परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे आणि अकोल्याचे उपविभागीय डॉ. निलेश अपार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. परिक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.