८0 उमेदवारांना १७५ अर्जांचे वाटप

By admin | Published: September 21, 2014 01:51 AM2014-09-21T01:51:47+5:302014-09-21T01:51:47+5:30

अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही.

175 applications distributed to 80 candidates | ८0 उमेदवारांना १७५ अर्जांचे वाटप

८0 उमेदवारांना १७५ अर्जांचे वाटप

Next

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार, २0 स प्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात एकही अर्ज दाखल झाला नसल्याने, उमेदवारी दाखल करण्याचा दिवस कोरडाच ठरला. दरम्यान, पाचही विधानसभा मतदारसंघात ८0 इच्छुक उमेदवारांना १७५ उमेदवारी अर्जांंचे वाटप करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून, त्याच दिवसापासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २0 सप्टेंबरपासून सुरू झाली. जिल्ह्यातील अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांंचे वाटप आणि उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. २0 ते २७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तथापि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाला नाही.

Web Title: 175 applications distributed to 80 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.