१७५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:31 PM2019-04-02T14:31:00+5:302019-04-02T14:31:06+5:30

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान पथकांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या १ हजार ७५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण सोमवारी शहरातील मेहेरबानो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात देण्यात आले.

 1759 officers and employees get voting training! | १७५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण!

१७५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रशिक्षण!

Next

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान पथकांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या १ हजार ७५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण सोमवारी शहरातील मेहेरबानो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात देण्यात आले.
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर व रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय मतदान पथके गठित करण्यात आली आहेत. त्यामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मतदासंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात १ हजार ७५९ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग घेतला. मतदान प्रक्रियासोबतच ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’हाताळणीचे प्रशिक्षणही देण्यात आले. या प्रशिक्षणात निवडणूक निरीक्षक (सामान्य) गुंजीयाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार मनोज लोणारकर, आशीष बिजवल, नायब तहसीलदार हर्षदा काकड यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मार्गदर्शन केले.
 
Web Title:  1759 officers and employees get voting training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.