पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १७९ तक्रारी; निपटारा करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:53 PM2018-04-16T18:53:39+5:302018-04-16T18:53:39+5:30
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या.
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व विभागप्रमुखांनी जनतेच्या तक्रारींचा १५ दिवसांच्या आत निपटारा करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, मनपाचे आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
नवीन तक्रारकर्त्यांना 15 दिवसांत आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल, असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तक्रार कर्त्यांना दिला. प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाºयांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.