१८ अंगणवाड्या आयएसओ मानांकनाच्या वाटेवर
By Admin | Published: December 2, 2014 11:50 PM2014-12-02T23:50:16+5:302014-12-02T23:50:16+5:30
लोणार पॅटर्न विदर्भात राबविणार!
मयुर गोलेच्छा/लोणार
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील १८ अंगणवाडी केंद्रांना लवकरच आयएसओ मानांकन मिळणार आहे. लोणार पॅटर्न म्हणून नावारूपास आलेला अंगणवाडीचा हा पॅटर्न संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या दृष्टीने अकोला, वाशिम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील एकात्मीक बालविकास प्रकल्पाच्या ५0 अधिकार्यांसह १२५ अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी या अंगणवाडी केंद्राची पाहणी करून, या पॅटर्नची अंमलबजावणी संपूर्ण विदर्भात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद येथील ह्यपारिजात कन्सल्टन्सी आएसओ सर्टीफिकेशन अँण्ड ऑडीटींगह्ण या संस्थेने आयएसओ मानांकन मिळवून देण्यासाठी लोणार तालुक्यातील आंगणवाडी केंद्रांची पाहणी करुन आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १८ अंगणवाडी केंद्रांची रंगरंगोटी करण्यात आली. रंगरंगोटी करताना भिंतीवर प्राण्यांची चित्रे, फळांची चित्रे, मराठी, इंग्रजी अक्षरे काढून सुशोभित आणि देखण्या आंगणवाड्या साकारण्यात आल्या. त्यामुळे गावातील किशोरवयीन मुलींचा अंगणवाडीत सहभाग वाढला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून अंगणवाडी केंद्रात प्रदर्शनी भरविण्यात आली. आता किशोरवयीन मुली या अंगणवाड्यांमध्ये स्वयंस्फुर्तीने शिक्षणाचे धडे देत आहेत.
सर्व निकष पूर्ण केल्याने लोणार तालुक्यातील गुंधा, वडगाव तेजन, सुलतानपूर, भानापूर, किन्ही, बिबी, आरडव, हिरडव, पळसखेड, गायखेड, अंजनीखुर्द येथील अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळणार आहे. आयएसओसाठी आवश्यक अंतिम मुल्यांकन औरंगाबाद येथील संस्थेने नुकतेच केले. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील मुलांना प्रशिक्षण कसे द्यायचे याचे प्रात्यक्षिक केंद्रचालकांना करुन दाखविले. आयएसओसाठी लोणार पॅटर्नचे आकर्षण विदर्भातील इतर अंगणवाड्यांनाही आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील एकात्मीक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच मुंबई येथील राजमाता मिशनच्या संचालकांनी या अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन लोणार पॅटर्न राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस व्यक्त केला.
*आंगणवाड्यांच्या नावातही वेगळेपण
आयएसओच्या वाटेवर असलेल्या लोणार तालुक्यातील आंगणवाड्यांच्या नावातही वेगळेपण आहे. अंगणवाडी केंद्रांची स्पर्धेच्या युगात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी या अंगणवाड्यांना ह्यचिमणी पाखरंह्ण, ह्यराजमाता जिजाऊह्ण, ह्यबालसंस्कार केंद्रह्ण, ह्यसाहस संस्कार केंद्रह्ण, ह्यसवंगडी संस्कार केंद्रह्ण यासारखी नावं देण्यात आली आहेत.
*काँन्व्हेंटची मुले आंगणवाड्यांमध्ये
आंगणवाडीबद्दल महिलांमध्ये जनजागृती केल्याने सीबीएससी पॅटर्नकडे जाणारे विद्यार्थीही अंगणवाडीत दिसू लागले आहेत. कॉन्व्हेंटच्या धर्तीवर दज्रेदार शिक्षण अंगणवाडी केंद्रातच मिळत असल्यामुळे मुलांचे पाय आंगणवाडी केंद्राकडे वळू लागले आहेत. काँन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलेही आता अंगणवाड्यांमध्ये ज्ञानाचे धडे गिरवितांना दिसत आहेत.