आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:51 PM2020-09-23T12:51:27+5:302020-09-23T12:51:45+5:30

८ शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

18 inter-district transfer teachers to be recruited! | आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार!

आंतरजिल्हा बदलीच्या १८ शिक्षकांना रुजू करून घेणार!

Next

अकोला : आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या १८ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद अंतर्गत रुजू करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाची फाइल मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आली.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत महिनाभरापूर्वी शिक्षकांच्या आॅनलाइन आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अकोला जिल्हा परिषद अंतर्गत २१ शिक्षक आले आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १४ आणि आणि उर्दू माध्यमाच्या ७ शिक्षकांचा समावेश आहे; परंतु जिल्ह्यात असलेल्या रिक्त पदानुसार पदानुसार आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांपैकी मराठी माध्यमाच्या १४ आणि उर्दू माध्यमाच्या ४ अशा एकूण १८ शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाईल २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मान्यता दिल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

१६ शिक्षक कार्यमुक्त!
आंतरजिल्हा बदलीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील १६ शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १४ व उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांचा समावेश आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या या १६ शिक्षकांना दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Web Title: 18 inter-district transfer teachers to be recruited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.