भारतात १८ कोटी लोक आर्थ्राइटिसने ग्रस्त
By admin | Published: October 12, 2015 01:47 AM2015-10-12T01:47:58+5:302015-10-12T01:47:58+5:30
आज जागतिक आर्थ्राइटिस दिन; आहार-विहाराने ठेवता येते नियंत्रण.
अकोला: बदलती जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे मनुष्याला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वयात मनुष्याला जडणार्या विविध विकारांपैकी सांधेदुखी हा आजार सामान्य आहे. सांध्यावर सूज येणे हा आजार म्हणजे ह्यआर्थ्राइटिसह्ण. आज भारतात तब्बल १८ कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. या विकाराबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात १२ ऑक्टोबर हा दिन जागतिक आ र्थ्राइटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आर्थ्राइटिस दिनाची थिम ह्यइटस् इन यूवर हॅन्डस्, टेक अँक्शनह्ण अशी आहे.
आर्थ्राइटिस हा एक ग्रीक भाषेतील शब्द आहे. ह्यआथ्रेसह्ण म्हणजे सांधा व ह्यआयटीसह्ण म्हणजे सूज. सांध्यावर सूज येणारा आजार म्हणजे आर्थ्राइटिस. आजच्या घडीला भारतातील जवळपास १८ कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत. आर्थ्राइटिसचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये आर्थ्राइटिस, रुम्हेटाइड आर्थ्राइटिस, ऑस्टियो आ र्थ्राइटिस, जुव्हेनाइल आर्थ्राइटिस व गाऊट आर्थ्राइटिस हे प्रमुख आहेत.
या विकाराची प्रमुख लक्षणे म्हणजे हाताची बोटे व गुडघे दुखणे, शरीरातील सांध्यांमध्ये दिवसभर वेदना होणे. विशेषत: सकाळी उठल्याबरोबर, लिहिताना किंवा कॉम्प्यूटरवर काम करताना हाताच्या बोटांचे सांधे दुखणे, मांडी घालून बसायला त्रास होणे, पायांचा अंगठा दुखणे, टाच दुखणे ही आहेत.