दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या जिल्ह्यातील १८ जणांच्या अहवालाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:53 AM2020-04-01T10:53:43+5:302020-04-01T10:56:09+5:30
स्वॉब नमुणे नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा चाचणी अहवाल काय येता, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
अकोला : वाडेगाव येथील कोरोनाचे १८ संशयित रुग्ण मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व संशयित रुग्ण दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतल्याची माहिती आहे. या संशयीत रुग्णांचे स्वॉब नमुणे नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा चाचणी अहवाल काय येता, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने १८ जणांना वैद्यकीय उपचारासाठी मंगळवारी रात्री उशीरा सर्वोपचार रुग्णालयात आणले. यावेळी प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपुर येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली. वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व लोक दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातुन २ मार्च रोजी अकोल्यात परत आल्याचे सांगत आहेत. तसेच यातील दोन जण दहा दिवसांपूर्वी साऊदी अरब येथून आले. ते मुळचे वाडेगावातील असून सौदीत राहत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुन्हा काही लोक सौदी अरेबिया येथून वाडेगावात दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यामुळे संशयित रुग्ण म्हणून त्यांना आरोग्य तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.