अकोला परिमंडलातील १८ हजारांवर कृषी पंपांना मिळणार ‘एचव्हीडीएस’द्वारे वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:27 PM2018-09-28T17:27:49+5:302018-09-28T17:34:33+5:30

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे.

18,000 agricultural pumps in Akola circle will get Power supply through HVDS | अकोला परिमंडलातील १८ हजारांवर कृषी पंपांना मिळणार ‘एचव्हीडीएस’द्वारे वीज पुरवठा

अकोला परिमंडलातील १८ हजारांवर कृषी पंपांना मिळणार ‘एचव्हीडीएस’द्वारे वीज पुरवठा

Next
ठळक मुद्दे उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची पारदर्शी आॅनलाइन निविदा प्रक्रिया पूर्ण .३१९ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश कंत्रांटदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची पारदर्शी आॅनलाइन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे ३१९ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश कंत्रांटदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. अकोला परिमंडलातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १८ हजार ५२४ कृषी पंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
या योजनेंतर्गत यापुढे एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषी पंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतकºयांची आता कायमची सुटका होणार आहे. या अनुषंगाने राज्य स्तरावर सर्वेक्षण करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाºया १८ हजार ५२४ जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला एचव्हीडीएस या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून साधारणत: २० ते २५ कृषी पंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. मात्र अनधिकृत विजेचा वापर करणारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषी पंपांना कमी दाबाने वीज पुरवठा होतो. वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर एचव्हीडीएस योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे.

 

Web Title: 18,000 agricultural pumps in Akola circle will get Power supply through HVDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.