१८६ ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठय़ाची वीज कापली!

By admin | Published: March 27, 2017 10:01 PM2017-03-27T22:01:49+5:302017-03-27T22:01:49+5:30

वाशिम जिल्ह्यात महावितरणची कारवाई; १.२४ कोटींची थकबाकी.

186 gram panchayat water supply cut off! | १८६ ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठय़ाची वीज कापली!

१८६ ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठय़ाची वीज कापली!

Next

वाशिम, दि. २७- जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींपैकी ४४३ ग्रामपंचायतींकडे महावितरणची ६.६१ कोटी रुपये थकबाकी आहे. पाणीपुरवठा योजनांना पुरविल्या जाणार्‍या विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबविली जात असून १.२४ कोटी रुपये थकबाकी असणार्‍या १८६ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वाढत्या थकबाकीमुळे महावितरणसमोर ह्यमार्च एन्डिंगह्णमुळे वसूलीचे मोठे आव्हान आहे. परिणामी वीज बील थकीत असलेल्या ग्राहकांची वीज तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वाशिम तालुक्यात ६५ ग्रामपंचायतींपैकी केवळ ११ ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा केली. वीज बील थकीत असलेल्या ४४ ग्रामपंचायतींचा विजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. मालेगाव तालुक्यात ७९ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींचा विजपुरवठा तोडण्यात आला. रिसोड तालुक्यातील ५१ पैकी २५, मंगरूळपीर तालुक्यात ७३ पैकी ३४, मानोरा तालुक्यात ७५ पैकी १२; तर कारंजा तालुक्यात १00 ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठय़ाची वीज कापण्यात आली आहे.

- संबंधित ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी चालू महिन्याचे बिल व जुन्या थकबाकीपैकी किमान ३0 ते ४0 टक्के रक्कम भरुन वीजपुरवठा पुर्ववत करावा. महावितरण सहकार्य करण्यास तयार आहे.
-डी.आर.बनसोडे
अधीक्षक अभियंता, वाशिम.

Web Title: 186 gram panchayat water supply cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.