जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:20+5:302021-08-12T04:23:20+5:30

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील ...

1.96 lakh farmers in the district lost 1.31 lakh hectares of crops and land! | जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

Next

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिके पाण्यात बुडाली तसेच शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक आणि जमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानासह खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर ९४ क्षेत्रावरील पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.

पीक, शेती नुकसानीचा असा आहे अंतिम अहवाल!

क्षेत्राचा प्रकार शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (रुपये)

जिरायती पिके १७८०८३ १२१२९५.३६ ८२४८०८४४८

बागायत पिके १०४१ ५७९.१८ ७८१८९३०

फळ पिके ९०९ ५८२.३३ १०४८१९४०

खरडून गेलेली जमीन १६६४९ ९०३८.०७ ३१०४२४८९८

..................................................................................................................................

एकूण १९६६८२ १३१४९४ ११५३५३४२१६

तालुकानिहाय शेतकरी आणि पिकांचे नुकसान !

तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

अकोला ६६८३५ ४७७३९.००

अकोट ९८९५ ५५१६.०६

तेल्हारा २८७७ २०५३.२३

बाळापूर २५१७४ २१३९८.४८

पातूर ३२०२८ २०९०७.०१

बार्शीटाकळी ३९५७८ २३०५१.०२

मूर्तिजापूर १६९६ ६२९.७५

‘या’ पिकांचे झाले नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद इत्यादी जिरायती खरीप पिकांसह भाजीपाला, कांदा व इतर बागायती पिके आणि पपई, केळी, लिंबू, पेरू, आंबा, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला.

डाॅ. कांतप्पा खोत

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: 1.96 lakh farmers in the district lost 1.31 lakh hectares of crops and land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.