१९८५ लिटर गावठी दारू जप्त

By admin | Published: May 21, 2014 10:19 PM2014-05-21T22:19:44+5:302014-05-22T23:42:14+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील तीन ठिकाणी छापा घालून बेवारस १९८५ लिटर गावठी दारू जप्त केली.

1985-liter villager seized | १९८५ लिटर गावठी दारू जप्त

१९८५ लिटर गावठी दारू जप्त

Next

अकोला : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील तीन ठिकाणी छापा घालून बेवारस १९८५ लिटर गावठी दारू जप्त केली. जप्त केलेली दारू अधिकार्‍यांनी घटनास्थळावरच नष्ट करून टाकली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी, पातूर नंदापूर आणि कानडी धरणाच्या बाजूला असलेल्या शेतशिवारामध्ये अवैध गावठी दारूच्या हातभ˜्या सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने बुधवारी दुपारी या तिन्ही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभ˜्यांवर छापा घातला. छाप्यादरम्यान तीनही हातभ˜्या बेवारसस्थितीत आढळून आल्या. या ठिकाणावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोहा सडवा दारू १९८५ लिटर जप्त करून, घटनास्थळावरच नष्ट केली. छाप्यादरम्यान १५ लिटरच्या ११९ डब्यामध्ये आणि २00 लिटरच्या एका बॅरेलमध्ये दारू भरलेली दिसून आली. सर्व मुद्देमाल बेवारस आढळून आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त पी.एच. पवार यांच्या आदेशावरून व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निरीक्षक जी.एम. सिरसाम, दुय्यम निरीक्षक आर.के. फुसे, आर.डी. पाटणे, सहायक दुय्यम निरीक्षक धांडे, सिरसाट, बुलडाण्याचे दुय्यम निरीक्षक मावळे, जवान त्रिपाठी, पटोकार, सोनोने, भांबलकर, महिला कर्मचारी कोमल शिंदे, बबिता गवई यांनी केली. 

Web Title: 1985-liter villager seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.