अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:25 AM2020-08-11T10:25:02+5:302020-08-11T10:25:08+5:30
१ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) सन्मान निधी योजना अंतर्गत ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यात २ हजार रुपयेप्रमाणे प्रत्येक वर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९४३ शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत ‘पीएम-किसान पोर्टल’वर अपलोड करण्यात आली.
त्यापैकी जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांना योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळत आहे.
हप्तानिहाय रक्कम जमा झालेल्या शेतकºयांची अशी आहे संख्या!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली.
१ लाख ८७ हजार ६८९ शेतकºयांच्या खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम, १ लाख ३४ हजार ३३७ शेतकºयांच्या खात्यात तिसºया हप्त्याची रक्कम, १ लाख १४ हजार ७०२ शेतकºयांच्या खात्यात चौथ्या हप्त्याची रक्कम आणि ६४ हजार ९६८ शेतकºयांच्या खात्यात पाचव्या हप्त्याची अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकºयांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. उर्वरित १२ हजार ६६९ शेतकºयांच्या आधार क्रमांकातील दुरुस्ती व इतर माहितीमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी