मोर्णा नदीच्या ‘डीपीआर’साठी २ कोटी
By admin | Published: April 15, 2017 01:57 AM2017-04-15T01:57:55+5:302017-04-15T01:57:55+5:30
अकोला: गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांची मंजुरी
अकोला: गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासनामार्फत निधी प्राप्त होणार असून, यापूर्वी मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागाराने मोर्णा नदी पात्रासह परिसरातील जमिनीच्या मोजमापाची प्रक्रिया पूर्ण केली. मोर्णा नदीचा ‘डीपीआर’तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे.
शहरातील नाले-गटारांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नदीचा वापर केला जातो.
गुजरातमध्ये साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी खासदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेतला. योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणात असल्याने मध्यंतरी मनपा प्रशासनाने तांत्रिक सल्लागारपदी विनायक कौंडिण्य यांची नियुक्ती केली. कौंडिण्य यांनी आस्टूल-पास्टूल येथून नदीचा सर्व्हे केला असून, मोर्णा नदीच्या पात्राची तसेच नदीकाठच्या परिसराची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. सौंदर्यीकरणाच्या कामाला गती यावी यासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, नदीचा ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.