विदर्भात महावितरणची कारवाई; ३ दिवसांत २ कोटींची वीज चोरी उघडकीस
By Atul.jaiswal | Published: January 22, 2018 04:55 PM2018-01-22T16:55:46+5:302018-01-22T16:59:47+5:30
अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.
अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात ११०१ ठिकाणी थेट मीटरमधून तर ९६६ ठिकाणी वीज तारांवर आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळुन आले असून, दोषींवर तडजोड शुल्काची आकारणी न करता थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.
या मोहीमेत संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. यासाठी सुमारे ४०० कर्मचाºयांची ९० पथके गठीत करण्यात आली होती. या मोहिमेत ११०१ ग्राहक थेट विजचोरी करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरूध्द विद्युत कायदा १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अभिनव पद्धतीने वीजचोरी करणारा सुत्रधार आणि वीजजमीटर सोबत छेडछाड करणाºया विरुद्ध कलम १३८ नुसार कठोर कारवाई केल्या जाणार आहे.
या मोहिमेत विदभार्तील बाराही मंडलातील १००१ ग्राहक मीटरमधून थेट वीज चोरी करत असल्याचे आढळून आले. यामध्ये नागपूर शहर मंडलातील १४, नागपूर ग्रामिण मंडलातील ९२, वर्धा ४३, अमरावती २१८, यवतमाळ ७५, अकोला ८४, वाशिम ११०, बुलढाणा २८७, चंद्रपूर ५९, गडचिरोली ५१, भंडारा ५७, आणि गोंदीया मंडलातील ११ वीजचोºयांचा समावेश आहे. याशिवाय वीज तारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणाºया सोबतच वीजेचा अनधिकृत वापर करणाºया एकूण ९६६ अशा एकूण २०६७ ग्राहकांवर महावितरणतर्फे कारवाई करण्यात येत आहे.
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने सामुहिकरित्या दरमहा आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी वीजचोरी व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
अकोला परिमंडळात पकडल्या ४८१ वीज चोऱ्या
महावितरणच्या अकोला परिमंडळातही आकस्मीक मोहिम राबविण्यात आली. परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या मंडळांमध्ये सलग तीन दिवस मोहिम राबविण्यात येऊन तब्बल ४८१ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आणली. यामध्ये अकोला ८४, वाशिम ११०, बुलढाणा २८७ वीज चोरी पकडण्यात आल्या.