ब्रदीनाथ, केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील २ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:00 PM2024-08-14T17:00:44+5:302024-08-14T17:02:03+5:30

तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

2 devotees from Maharashtra returning from Bardinath, Kedarnath died in an accident | ब्रदीनाथ, केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील २ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू, ३ जखमी

ब्रदीनाथ, केदारनाथहून परतणाऱ्या महाराष्ट्रातील २ महिला भाविकांचा अपघातात मृत्यू, ३ जखमी

तेल्हारा (जि. अकोला)  - बद्रीनाथ केदारनाथ यात्रे करिता तेल्हारा येथील भाविक भक्त गेले होते परतीच्या प्रवासादरम्यान श्रीनगर येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर बसलेल्या पाच महिलांना पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात. सदर घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली 

तेल्हारा शहरातील व इतर ठिकाणचे असे १२० भाविक बद्रीनाथ केदारनाथ यात्रेकरिता गेले होते. सर्व भक्त दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाकरिता निघाले असता, उत्तराखंड मधील श्रीनगर येथे रात्रीचा मुक्कामाकरिता हॉटेलमध्ये उतरले. यातील पाच महिला हॉटेलच्या समोर असलेल्या  नालीवर असलेल्या ओट्यावर बसलेल्या होत्या. तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. प्रथम त्याने रस्त्यावर असलेल्या गाईला धडक दिली. त्यानंतर टँकर ओट्यावर चढला यात पाचही महिला टँकरच्या खाली आल्या यात. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात.

मृत्यू झालेल्यामध्ये तेल्हारा येथील गौरी नरेंद्र भैय्या (४५), ललिता हरीश टावरी(४४) यांचा समावेश आहे तर जखमी झालेल्यांमध्ये सारिका राजेश राठी, संतोषी धनराज राठी, मधुबाला राजेंद्र कुमार यांचा समावेश आहे. जखमींची गाव समजू शकले नाहीत. अपघात इतका भयंकर होता की जेसीबी मदत घेऊन जखमी व मृतकाना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आहे. मृत्यू झालेल्या भाविकांवर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: 2 devotees from Maharashtra returning from Bardinath, Kedarnath died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात