अकोला जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ४० हजार लसी प्राप्त

By Atul.jaiswal | Published: January 10, 2024 06:37 PM2024-01-10T18:37:19+5:302024-01-10T18:37:29+5:30

शेळ्या, मेंढ्यांमधील पीपीआर हा रोगदेखील विषाणूजन्य असून या आजारात १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो

2 lakh 40 thousand vaccines received for vaccination of animals in Akola district | अकोला जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ४० हजार लसी प्राप्त

अकोला जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ४० हजार लसी प्राप्त

अकोला : पशुधनातील लाळ खुरकत हा रोग विषाणूजन्य आजार आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाला २ लाख ४० हजार ६०० लसमात्रा प्राप्त असून, जिल्ह्यातील ७५ पशुवैद्यकीय संस्थांना वितरित करण्यात आल्या आहेत. 

अकोला जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ६८ गाय व म्हैसवर्गीय जनावरे, तसेच एक लाख ६० हजार ६९७ शेळ्या, मेंढ्या आहेत. गाय, जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणापासून एकही पशुधन वंचित राहणार नाही याची सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. जनावरांच्या खुरामध्ये तसेच तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गाभण गाय/म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो. या रोगाची लागण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.

शेळ्या, मेंढ्यांमधील पीपीआर हा रोगदेखील विषाणूजन्य असून या आजारात १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. नाकातून व डोळ्यांतून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना हगवण लागून यामुळे मृत्यू होतो. या रोगाची लागणसुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनास या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. बुकतारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट आणि सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

Web Title: 2 lakh 40 thousand vaccines received for vaccination of animals in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.