२ लाख ४३ विद्यार्थ्यांचे तयार होणार प्रोग्रेस कार्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:39 AM2017-09-09T01:39:19+5:302017-09-09T01:39:24+5:30
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली. जिल्हय़ातील इयत्ता दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर पायाभू त चाचणीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या पायाभूत चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरणार आहेत. हे अ िप्लकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्हय़ा तील २ लाख ४३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार होईल.
नितीन गव्हाळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली. जिल्हय़ातील इयत्ता दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर पायाभू त चाचणीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या पायाभूत चाचणीमध्ये मिळणारे गुण शिक्षक अप्लिकेशनमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरणार आहेत. हे अ िप्लकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील. त्यामुळे जिल्हय़ा तील २ लाख ४३ हजार ५00 विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस कार्ड तयार होईल.
वर्गातील प्रत्येक विद्यार्थी, शाळा प्रगत करणे हा पायाभू त चाचण्या घेण्यामागील मुख्य उद्देश आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून गुरुवारपासून इयत्ता दुसरी ते नववीतील २ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय स् तरावर पायाभूत चाचणीस सुरुवात झाली आहे. गुरुवारी प्रथम भाषेचे पेपर घेण्यात आले.
शुक्रवारी गणित विषयाचा पेपर घेण्यात आला, तर ११ व १२ सप्टेंबर रोजी इंग्रजी व विज्ञान विषयाचे पेपर होणार आहेत. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित आणि इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, इंग्रजी (तृतीय भाषा) विषयाचे पेपर घेण्यात येत आहेत. पायाभूत चाचणीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची कोणत्या विषयात प्रगती समाधानकारक आहे, असमाधानकारक आहे, हे विद्यार्थ्यांच्या गुण मूल्यांकनावरून ठरविण्यात येणार आहे. शिक्षकांनी गुणांचे मूल्यांकन केल्यानंतर मूलभूत क्षमतेत ७५ टक्केपेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील क्षमतेत ६0 टक्केपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्या र्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनविण्यात येणार आहेत.
अशा अप्रगत मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल. प्रगत विद्यार्थी प्रगत होईपर्यंत दर महिन्याला त्याची चाचणी घेतली जाणार आहे. पायाभूत चाचणी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांंना अनिवार्य आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस् थळावर भरले जातील. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रोग्रेस कार्ड तयार होईल.
गैरप्रकार टाळण्यासाठी समिती
पायाभूत चाचणीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गुणवाढ होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमली आहे. या समितीतील अधिकारी व सदस्य प्रत्येक शाळेला भेट देऊन पाहणी करीत आहेत.
विद्यार्थी, वर्ग, शाळा प्रगतीचे निकष
वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारा विद्यार्थी प्रगत झाला, असे समजण्यात येईल. तसेच वर्गातील विद्यार्थ्यांंचे एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांंनी ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविले, तर एकूण गुणांपैकी ६0 टक्केपेक्षा जास्त गुण असल्यास ती शाळा प्रगत समजली जाईल.
शिक्षकांसाठी प्रोत्साहनपर योजना
एकूण गुणांपैकी सर्व विद्यार्थ्यांंना ४0, ६0, ८0 टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता वाढीसह उत्तेजनार्थ पत्र, अभिनंदन पत्र देण्यात येणार आहे.
पायाभूत चाचणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. २ लाख ४३ हजार विद्यार्थी चाचणी देत आहेत. चाचणीदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी समिती नेमली आहे.
- प्रशांत दिग्रसकर,
शिक्षणाधिकारी प्राथमिक