जिल्हा स्त्री रुग्णालयाला २० लाखांचा पुरस्कार, कायाकल्प पुरस्कारात राज्यात ठरले दुसरे
By सचिन राऊत | Published: March 23, 2024 05:58 PM2024-03-23T17:58:44+5:302024-03-23T18:01:11+5:30
सार्वजनिक आराेग्य सेवा देणाऱ्या राज्यातील रुग्णालयांपैकी अकाेल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
अकाेला : सार्वजनिक आराेग्य सेवा देणाऱ्या राज्यातील रुग्णालयांपैकी अकाेल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. कायाकल्प पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालयाला २० लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची माहीती आहे. राज्यातील १९ जिल्हयातील रुग्णालयांमधून हा पुरस्कार मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक आराेग्य संस्थांमध्ये उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना याेग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड असते. हे प्रकार कमी व्हावे तसेच रुग्णांना स्वच्छ वातावरणात याेग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या आराेग्य विभागाकडून आराेग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले असून त्यांना कायाकल्प यामध्ये २० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी ३ लाखांचा प्राेत्साहनपर पुरस्कार स्त्री रुग्णालयाला मिळाला आहे. मात्र आता राज्यात दुसऱ्या क्रमांकारवर आल्याने या ठिकाणच्या आराेग्य सुविधा रुग्णांसाठी चांगल्या असल्याचे प्रमाणपत्रच मिळाले आहे.
मूल्यांकनात स्त्री रुग्णालय अव्वल
राज्याच्या आराेग्य विभागाने १९ जिल्हयातील सार्वजनीक आराेग्य विभागाच्या रुग्णालयांची स्वच्छता, याेग्य आराेग्य सुवीधा, प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात मूल्यांकन करण्यात आले असता यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय अव्वल ठरले. एखाद्या खासगी रुग्णालयाप्रमाणे या ठिकाणी सुविधा असल्याने त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासाेबतच स्वच्छ वातावरणात रुग्णांना हेल्दी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रत्येक अधिकारी व कर्मचारी करीत आहे. त्यामुळे कायाकल्प पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले. यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधिक्षिका वंदना वसाे पटाेकार यांचेही माेठे याेगदान हाेते. यावर्षी आता प्रथम पुरस्कार मिळावा असा मानस असून त्या दृष्टीने कार्य करण्यात येत आहे.
डाॅ. जयंत पाटील
वैद्यकीय अधीक्षक
जिल्हा स्त्री रुग्णालय अकाेला.