वऱ्हाडातील धरणात २० टक्केच जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:51 PM2018-07-06T13:51:48+5:302018-07-06T13:54:27+5:30
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघु मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ५ जुलैपर्यंत केवळ २० टक्केच जलसाठा संचयित झाला. ४ जून रोजी या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा होता. म्हणजेच पावसाळ््याच्या मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली. या उन्हाळ््यात तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्'ातील १८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ९.५५ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट अद्याप संपले नाही. याच जिल्ह्यातील निर्गुणा, उमाव मोर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा २.७९, तर उतावळी धरणातील पातळी ३.१३ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ११.५२ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात २.२० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये ११.८५ टक्के, मन धरणात १०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे.
वाशिम जिल्'ातील धरणात वाढला जलसाठा!
मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४६.२० टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील १०.७८ टक्क्याहून ३४.१७ टक्क्यावर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्'ातील दोन धरणात १ ते २ टक्के वाढ झाली. अमरावती जिल्'ातील उर्ध्व वर्धा धरणात केवळ ३४.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ४८.६७, अरुणावती १५.४८ तर बेंबळा धरणात १६.५९ टक्केच जलसाठा आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वाण धरणात गत एक महिन्यात जलसाठा वाढला नसून, गतवर्षीचा ५८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.