दिवसभरात २० पॉझिटिव्ह; १९ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 06:21 PM2020-10-21T18:21:14+5:302020-10-21T18:21:40+5:30
Akola, CoronaVirus Slow down आणखी १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, बुधवार, २१ आॅक्टोबर रोजी २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,१४५ झाली आहे. दरम्यान, आणखी १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १८५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये आश्रय नगर येथील तीन, मणकर्णा प्लॉट, सिंधी कॅम्प व अकोट येथील प्रत्येकी दोन, बाभुळगाव जहाँगीर, उमरी, मलकापूर, पिंपळखुटा, डाबकी रोड, न्यु महसूल कॉलनी, बाळापूर, गोरे अर्पाटमेन्ट, खडकी खदान, ताजीपूर व शिवर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
१९ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार, कोविड केअर सेंटर येथून तीन, अकोला अॅक्सीडेंट हॉस्पीटल, हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी दोन, अवघाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४६३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,१४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.