पुनोतीच्या ग्राहकाला दिले२0 हजारांचे वीज देयक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 08:13 PM2017-11-09T20:13:24+5:302017-11-09T20:15:08+5:30
सायखेड : धाबा विद्युत वितरण केंद्रांतर्गत येणार्या पुनोती खु. ये थील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला एक महिन्याचे घरगुती वीज वापराचे देयक २0 हजार आठशे रुपये देण्याचा प्रताप विद्यु त वितरण केंद्राने घडविला.
लोकमत न्यूज नेटवर्क

विशेष म्हणजे, वीज वापर कमी असताना व दरमहा २00 ते ४00 रुपये बिल येत असताना सदर ग्राहकाचे इलेक्ट्रिक मीटर अतिवेगाने फिरते. त्याबाबत त्यांनी वितरण विभागाला लेखी अर्जाद्वारे कळविले, तरीही दखल घेतल्या गेली नाही. धाबा विद्युत वितरण केंद्राच्या हद्दीत येणार्या गावामध्ये अनेक वीज ग्राहकांच्या घरातील मीटर रिडिंग न घेता फॉल्टी मीटरच्या नावाखाली जास्त वीज बिल देऊन होणारी अवैध वीज चोरी ख पविली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी असूनसुद्धा त्याचे निवारण होत नसल्याने व येणारे जास्त बिल भरण्यास असर्मथ असल्याने ग्राहकांकडील मीटर काढून नेण्यात येते. हा प्रकार ग्रामीण भागात सुरू असून, याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.