बोरगाव मंजू येथे २0 हजारांचा गुटखा जप्त
By admin | Published: August 29, 2016 01:26 AM2016-08-29T01:26:27+5:302016-08-29T01:26:27+5:30
२0 हजार रुपये किमतीचा गुटखा व ५५ हजार रुपयांची मोटारसायकल जप्त.
बोरगाव मंजू (जि.अकोला), दि. २८: स्थानिक आठवडीबाजारातून एक युवक रविवारी मोटारसायकलवरून दोन बॅगमध्ये २0 हजार रुपयांचा गुटखा घेऊन जात होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील गुटखा व मोटारसायकल जप्त केली.
बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके, हेड कॉन्स्टेबल अनिल एद्मोवार, हरीश सातव, प्रकाश जुनगडे, शशीकांत पाटील, नामदेव केंद्रे हे गस्त घालत असताना एम.एच.२७ ए.७ ४५२२ क्रमांकाच्या मोटारसायकलवर एक युवक कापडाच्या दोन बॅगमध्ये काहीतरी नेत असताना आढळला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मोटारसायकलला अडवून झडती घेतली असता त्याच्याजवळील दोन बॅगांमध्ये एका कंपनीचा गुटख्याची पाकिटे असल्याचे आढळून आली. त्यामुळे चौकशीत सदर युवकाचे नाव मो.समीर असून तो बोरगाव मंजूचा रहिवासी असल्याचे कळून आले. त्याच्याजवळील दोन बॅगातील २0 हजार रुपये किमतीचा गुटखा व ५५ हजार रुपयांची मोटारसायकल, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकाराबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली. या प्रकरणी ठाणेदार तवर व पोलीस उपनिरीक्षक उईकेंसह पोलीस पुढील तपास करीत आहेत.