रोज २0 टन कांदा, बटाट्याचा साठा, आता प्रतीक्षा साठा निश्चितीची
By admin | Published: July 7, 2014 12:36 AM2014-07-07T00:36:12+5:302014-07-07T00:55:30+5:30
अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते.
अकोला-जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी ४0 टन उलाढाल होते. सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. जिल्ह्यात रोज कांदा आणि बटाट्याची प्रत्येकी २0 टन खरेदी-विक्री होते. अर्थात रोज २0 टनापेक्षा जास्त कांदा आणि आलूचा साठा होतो. त्यामुळे आता शेतकरी आणि व्यापार्यांचे साठा निश्चितीकडे लक्ष लागले आहे.
दिवसेंदिवस भाजीपाल्यासह कांदा, बटाट्यांच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केल्यानंतर साठेबाजीला लगाम लागणार आहे.
व्यापार्यांच्या कांदे-बटाट्याच्या साठय़ाची र्मयादा ठरविण्याचे आदेशही केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. राज्यातील कांदा आणि बटाट्याचे उत्पादन लक्षात घेऊन साठय़ाची र्मयादा निश्चित करण्यात येणार आहे. कांदा आणि बटाट्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून एका वर्षासाठी बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कोणालाही कांदा व बटाटे विकू शकतील आणि याला बाजार समिती अटकाव करू शकणार नाही.
दरम्यान, अकोल्यात वाडेगावसह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी येतो.
अकोल्यात कांदा- बटाटे खरेदीदार कमी असून, केवळ कमिशन तत्त्वावरच खरेदी-विक्री होते. बाजार समिती परिसरात अनेक व्यापार्यांनी कांदे आणि बटाट्यांची साठवणूक केली आहे. राज्य सरकारने साठा निश्चित केल्यानंतर साठेबाजीबाबत कारवाई होणार आहे.
** मोठे व्यापारी बनले शेतकरी
जिल्ह्यात कांदा-बटाट्यांची कमिशन तत्त्वावर खरेदी-विक्री करणारे अनेक व्यापारी आहेत. हे व्यापारीच शेतकरीही आहेत. त्यामुळे साठा निश्चित करताना नेमके कोणते निकष लावण्यात येतात, याकडे व्यापार्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप केंद्र आणि राज्य सरकारने अध्यादेश जारी केलेला नाही.