२० वर्षांपूर्वी फरार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:40 AM2017-07-30T02:40:41+5:302017-07-30T02:40:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: जबरी चोरी, वाटमारी आदी गंभीर प्रकरणांशी संबंधित असलेला व २० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रमेश गोविंद शिंदे यास तालुक्यातील कोंडोली येथून अमरावती ग्रामीण पोलिसांनी २८ जुलै रोजी अटक केली.
२० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रमेश शिंदे रा. कोंडोली याच्यावर जबरी चोरी, वाटमारी आदीसारख्या गंभीर प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ, दस्तगीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आरोपी हा २० वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत होता.
आरोपीच्या शोधात अमरावती ग्रामीण पोलीस हे दोन दिवसांपूर्वी मानोरा पोलीस स्टेशनला दाखल झाले.
कोंडोली बिटचे जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला रंगेहात अटक करून अमरावती पोलिसांच्या स्वाधीन केले.