२0२0 ऑलिम्पिकची तयारी

By admin | Published: August 29, 2016 01:20 AM2016-08-29T01:20:52+5:302016-08-29T01:20:52+5:30

बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्यातून प्रबळ दावेदार.

2020 Olympic preparations | २0२0 ऑलिम्पिकची तयारी

२0२0 ऑलिम्पिकची तयारी

Next

अकोला, दि. २८: जिल्ह्याने नयनतारा बागडे हिच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला आंतरराष्ट्रीय बॉक्सर दिली. अनेक राष्ट्रीयस्तर बॉक्सर महाराष्ट्राला देणारा अकोला जिल्हा आता २0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रबळ दावेदार दिला आहे. १६ वेळ राष्ट्रीय विजेता ठरलेला आदित्य मने ऑलिम्पिकचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.
अकोल्यातील पहिली बॉक्सिंग रिंग हिंदू युथ जिमको येथे हिंदूसेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ यांनी तयार केली होती. माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पहिल्या राष्ट्रीयस्तर बॉक्सिंग स्पर्धेचे अकोल्यात आयोजन केले होते. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट लाभल्यानंतर अकोला जिल्हाला बॉक्सिंगचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली.
शैक्षणिक वर्ष २0१५-१६ मध्ये एकट्या बॉक्सिंग खेळाने अकोला जिल्ह्याला ५५ सुवर्णपदकांसह एकूण १४८ पदक मिळवून दिली. यामध्ये ४३ रौप्यपदक आणि ५0 कांस्यपदकांचा समावेश आहे. क्रीडा प्रबोधिनी आणि अकोला जिल्हा मुष्टियुद्ध प्रशिक्षण केंद्र तसेच अनिवासी क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांंनी देशभरात विविध स्पर्धांंवर वर्चस्व कायम ठेवून तब्बल १४८ पदकांची कमाई केली. २२ बॉक्सरांची निवड नॅशनल कॅम्पकरिता झाली होती. वर्षभरात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत एकूण २७४ बॉक्सरांनी सहभाग घेतला होता. जळगाव येथे झालेल्या ८५ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला संघ चार सुवर्ण, पाच रौप्य आणि एका कांस्यपदकासह अव्वल ठरला.
यंदा अकोल्यात तीन राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. अकोल्याच्या तब्बल २२ बॉक्सरांची निवड नॅशनल कॅम्पकरिता झाली. यामध्ये ज्युनिअर विश्‍व चॅम्पियनशिप स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरात पाच, युथ चॅम्पियनशिप नॅशनल कॅम्पकरिता दोन आणि स्कूल नॅशनल बॉक्सिंग कॅम्पकरिता १५ बॉक्सरांची निवड झाली होती.लंडन नाइट-फाइट बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या धर्तीवर अकोल्यातही दोन वर्षांंपूर्वी अकोला नाइट-फाइट बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येते.

अकोल्यातील पहिली बॉक्सिंग रिंग हिंदू युथ जिमको येथे हिंदूसेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ यांनी तयार केली होती. माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पहिल्या राष्ट्रीयस्तर बॉक्सिंग स्पर्धेचे अकोल्यात आयोजन केले होते. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट लाभल्यानंतर अकोला जिल्हाला बॉक्सिंगचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली. शैक्षणिक वर्ष २0१५-१६ मध्ये एकट्या बॉक्सिंग खेळाने अकोला जिल्ह्याला ५५ सुवर्ण पदकांसह एकूण १४८ पदक मिळवून दिली. यामध्ये ४३ रौप्य पदक आणि ५0 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Web Title: 2020 Olympic preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.