खरबडून गेलेल्या जमीन नुकसान भरपाईपोटी २१ लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:54 PM2019-08-02T15:54:35+5:302019-08-02T15:54:40+5:30
खरबडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ५५ शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी २१ लाख ३१ हजार ८७५ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.
अकोला : गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे खरबडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ५५ शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी २१ लाख ३१ हजार ८७५ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे जमीन खरबडून गेलेल्या जिल्ह्यातील ५५ शेतकºयांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत ५५ शेतकºयांची ५६.८५ हेक्टर आर शेतजमीन खरबडून गेली होती. खरबडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी संबंधित ५५ शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी २१ लाख ३१ हजार ८७५ रुपयांचा मदतनिधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी २ जुलै रोजी संबंधित तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात येणार असून, जमीन खरबडून गेलेल्या नुकसान भरपाईची मदत संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.
तालुकानिहाय शेतकरी आणि खरबडून गेलेली जमीन!
तालुका शेतकरी जमीन (हेक्टर)
मूर्तिजापूर २४ ५४.०५
बाळापूर १५ २.३५
पातूर ०१ ०.०५
अकोला ११ ०.२०
बार्शीटाकळी ०४ ०.२०
.........................................................................
एकूण ५५ ५६.८५