२११ झोपडपट्टय़ांचा सर्व्हे आटोपला!
By admin | Published: October 2, 2016 02:15 AM2016-10-02T02:15:37+5:302016-10-02T02:15:37+5:30
‘पीएम’ आवास योजने अंतर्गत अकोला शहरातील ३८ हजार नागरिकांना हवे घर.
अकोला, दि. 0१- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील तब्बल २११ झोपडपट्टय़ांमधील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, घरकुलासाठी ३८ हजार लाभार्थ्यांंची नोंदणी झाली आहे. मनपाच्या दप्तरी ८४ झोपडपट्टय़ा अधिकृत असून, उर्वरित झोपडपट्टय़ा अघोषित असल्याची माहिती आहे.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ह्यसर्वांंसाठी घरेह्ण बांधून मिळतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपाने शिवसेना वसाहत, मातानगर, गुरुदेवनगर या तीन भागांतील १ हजार ६00 घरकुलांच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्यानंतर केंद्राने तपासणी करून १ हजार २४२ घरकुलांचा प्रस्ताव मान्य केला. घरकुलांसाठी शासनाने ६२ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ५२ कोटींना मंजुरी मिळाली. ह्यपीएमह्णआवास योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शून्य कन्सलटन्सीने आजपर्यंंत २११ झोपडपट्टय़ांमध्ये सर्वेक्षण केले असता, सुमारे ३८ हजार गरजू लाभार्थ्यांंनी हक्काच्या घरासाठी कंपनीकडे नोंदणी केली आहे. लाभार्थ्यांंकडून प्राप्त अर्जांंची छाननी करण्याचे काम कंपनीच्या स्तरावर सुरू झाले असून, दुसर्या टप्प्यात शहरात विखुरलेल्या व गरिबी रेषेच्या व्याख्येत समाविष्ट होणार्या नागरिकांच्या सर्वेक्षणाचे व त्यांच्या नोंदणीचे काम सुरू केले जाईल. येत्या चार दिवसांत नोंदणीच्या कामाला सुरुवात करण्याचे महापालिका आयुक्त अजय लहाने यांचे निर्देश आहेत.