२१६ तलाव ‘ड्राय’!
By admin | Published: April 13, 2016 01:30 AM2016-04-13T01:30:58+5:302016-04-13T01:30:58+5:30
अकोला जिल्ह्यातील गावतलाव, सिंचन तलाव आटलेत.
अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील २१६ तलाव कोरडेठण्ण (ड्राय) पडले आहेत. त्यामध्ये सिंचन तलाव, गावतलाव व पाझर तलावांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये गावागावांमधील तलावदेखील कोरडे पडले आहेत. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील २१६ तलाव पाण्याविना कोरडे पडले असून, त्यामध्ये १९ सिंचन तलाव, १५९ गावतलाव आणि ३८ पाझर तलावांचा समावेश आहे. तलावांमध्ये पाणी नसल्याने, संबंधित गावांमधील पाणीटंचाईत भर पडली आहे. तलावांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, सिंचन तलाव पाण्याविना कोरडे पडल्याने या तलावांद्वारे सिंचनासाठी उपलब्ध होणार्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.