जात वैधता प्रमाणपत्रासाठी २१९ प्रस्ताव!
By Admin | Published: February 7, 2017 03:20 AM2017-02-07T03:20:23+5:302017-02-07T03:25:38+5:30
निवडून येणार्या उमेदवारांना दिले जाणार प्रमाणपत्र
अकोला, दि. ६-महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्या इच्छुक २१९ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समि तीकडे प्रस्ताव दाखल केले. प्रस्ताव दाखल केलेल्या उमेदवारांपैकी निवडणुकीत निवडून येणार्या उमेदवारांना जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अकोला महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित प्रभागा तून निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याबाबतचे प्रस्ताव उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३ फेब्रुवारी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गत ३ फेब्रुवारीपर्यंंत २१९ उमेदवारांनी दाखल केलेले प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून स्वीकारण्यात आले. प्रस्ताव दाखल केलेल्या उमेदवारांपैकी मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी समि तीकडून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.