२२ खेळाडू राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:29 AM2017-08-12T02:29:11+5:302017-08-12T02:29:29+5:30

अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांच्यावतीने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. या राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीकरिता अकोला जिल्हय़ातील २२ खेळाडू पात्र ठरले आहेत.

22 players eligible for National Sports Scholarship! | २२ खेळाडू राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र!

२२ खेळाडू राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीस पात्र!

Next
ठळक मुद्दे२0१६-१७ वर्षासाठी शिष्यवृत्ती भारतीय शालेय खेळ महासंघाची योजना 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांच्यावतीने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविणार्‍या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. या राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीकरिता अकोला जिल्हय़ातील २२ खेळाडू पात्र ठरले आहेत.
सन २0१६-१७ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने  विविध खेळाच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणार्‍या व प्रावीण्य प्राप्त करणार्‍या अकोला जिल्हय़ातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांंमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूंना रुपये ११२५0, द्वितीय क्रमांक प्राप्त करणार्‍यास ८९५0 व तृतीय क्रमांक प्राप्त करणार्‍या खेळाडूस रुपये ६७५0 व सहभागी खेळाडूस ३७५0 रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येते.
जिल्हय़ातील बॉक्सिंग, कुडो, कबड्डी, तायक्वांदो, हॅण्डबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, रस्सीखेच,  खो-खो, वेटलिफ्टिंग आदी खेळाचे खेळाडू शिष्यवृतीस पात्र ठरले आहेत. यामध्ये शाकीब अक्रम खान बॉक्सिंग, ऋषिकेश काळे कुडो, ऋतुजा वावगे कबड्डी, ऋतिक शिंदे बॉक्सिंग, अंजली तायडे तायक्वांदो, समृद्धी गोसावी हॅण्डबॉल, हर्षल मेश्राम व्हॉलीबॉल, आरती सोनवणे बेसबॉल, गौरी जयसिंगपुरे बॉक्सिंग, पल्लवी जोशी कुडो, सय्यद अली बॉक्सिंग, जयश्री तायडे रस्सीखेच, रोहिणी फड तायक्वांदो, पुनम कैथवास बॉक्सिंग, युग गावंडे बेसबॉल, साक्षी गायधनी बॉक्सिंग, प्रशंसा तायडे कुडो, अजय पेंदुर बॉक्सिंग, शिवानी सुरवाडे रस्सीखेच, भावेश खोकले खो-खो, देवानंद शुक्ला वेटलिफ्टिंग, कादंबरी खापरे बेसबॉल या खेळाडूंचा समावेश आहे.
पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आपले सहभाग, प्रावीण्यप्राप्त केलेल्या सन २0१६-१७ चे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडूंचे बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स २0 ऑगस्टपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावी. 
अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली. 

Web Title: 22 players eligible for National Sports Scholarship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.