प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द
By Atul.jaiswal | Published: August 30, 2022 12:38 PM2022-08-30T12:38:08+5:302022-08-30T12:41:50+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातून जाणाऱ्या हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेससह २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अकोला : दक्षिण-पूर्व, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर व बिलासपूर स्थानकांदरम्यान तिसऱ्या लाइनचे काम व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातून जाणाऱ्या हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेससह २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २२ गाड्यांचाही समावेश असल्याने ऐन सण, उत्सवाच्या काळात अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
भूसावळ मंडळ कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ३० ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर व १८०२९ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस : ३० ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. याशिवा १२८१० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल, १२८०९ मुंबई सीएसएमटी- हावडा मेल, १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, १२८३३ अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस या गाड्याही ३० ऑगस्ट ते ०४ सप्टेंबरपर्यंत धावणार नाहीत.
रद्द करण्यात आलेल्या इतर एक्स्प्रेस गाड्या खालील प्रमाणे
१२१०१ एलटीटी-शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस : ३० ऑगस्ट, २ व ३ सप्टेंबर
१२१०२ शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस : १, ४ व ५ सप्टेंबर
२२८४६ हाटिया-पुणे एक्स्प्रेस : २ सप्टेंबर
२२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस : २ सप्टेंबर
१२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस : २ व ३ सप्टेंबर
१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस : ४ व ५ सप्टेंबर
१२९०५ पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस : ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर
१२९०६ शालिमार-पोरबंदर-एक्स्प्रेस : २ व ३ सप्टेंबर
२२८९४ हावडा-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस : १ सप्टेंबर
२२८९३ साईनगर शिर्डी-हावडा एक्स्प्रेस : ३ सप्टेंबर
२२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस : ४ सप्टेंबर
२२९०४ शालिमार-ओखा एक्स्प्रेस : ६ सप्टेंबर