भाव फरकापोटी ७०५ बीजोत्पादकांना महाबीजकडून २.२३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 10:16 AM2021-03-23T10:16:57+5:302021-03-23T10:17:06+5:30
Mahabeej News जिल्ह्यातील ७०५ बीजोत्पादकांच्या खात्यात २ कोटी २३ लाख ६६ हजार ५३३ रुपये जमा करण्यात आले आहे.
अकोला : महाबीजकडून बीजोत्पादकांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारित मूळ दर यामधील फरकाची रक्कम देण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील ७०५ बीजोत्पादकांच्या खात्यात २ कोटी २३ लाख ६६ हजार ५३३ रुपये जमा करण्यात आले आहे. ही रक्कम २९ हजार ४५२ क्विंटल बियाण्यांसाठी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून बियाण्यांसाठी शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा, करडई, मूग खरेदी केली जाते. खरीप व रब्बी हंगामात हा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पात शेतकऱ्यांना बाजार समितीत असलेले त्यावेळचे दर आणि शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीमधील तफावत रक्कम नंतर दिली जाते. त्यासाठी ‘महाबीज’कडून शासनाला प्रस्ताव पाठविला जातो. या दोन किमतीमधील तफावत ही बोनस म्हणून शेतकऱ्यांना मिळते. गतवर्षी बाजार समित्यांमध्ये शेत मालाचे दर पडल्याने हरभरा बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या हमी दरापेक्षा कमी मोबदला मिळाला होता. त्यात अकोला जिल्ह्यात हरभरा, तूर, करडई व मुगाचे बीजोत्पादन करणाऱ्या ७०५ शेतकऱ्यांचा समावेश होता. शासन धोरणानुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर पडल्यास हमीभाव गृहीत धरून त्यात २५ टक्के अधिक रकमेचा समावेश करून शेतकऱ्यांना फरकाची रक्कम बियाणे महामंडळाला द्यावी लागते. त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या २९ हजार ४५२ क्विंटल बियाण्यांसाठी फरकाची रक्कम म्हणून २ कोटी २३