शेतकरी आत्महत्याची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:32+5:302021-08-28T04:23:32+5:30
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ...
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सात शेतकरी आत्महत्याची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याच्या ३० प्रकरणावर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्याची २३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, उर्वरित सात शेतकरी आत्महत्याची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. मदतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या प्रकरणात शेतकरी आत्महत्याग्रस्त संबंधित कुटुंबांना शासनामार्फत निश्चित करण्यात आलेली मदत वितरित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.