पोस्ट कोविडच्या २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:38+5:302021-01-18T04:16:38+5:30
यांनी घ्यावी विशेष खबरदारी फुप्फुस, हृदयाशी संबंधित किंवा इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणारे रुग्ण, वयस्क रुग्णांना कोरोनाच्या संसर्गात गंभीर ...
यांनी घ्यावी विशेष खबरदारी
फुप्फुस, हृदयाशी संबंधित किंवा इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणारे रुग्ण, वयस्क रुग्णांना कोरोनाच्या संसर्गात गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास अशांच्या फुप्फुसावर परिणाम झालेला दिसतो. अनेकांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळून येत आहेत. अनेक रुग्णांमध्ये चालताना थकवा येणे, धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे, चक्कर येणे, फुप्फुसात दाह होणे यासारखी लक्षणे आढळत असल्याने त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनातून बरे झाले असाल, तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा येणे, धाप लागणे यासह इतर लक्षणे दिसताच सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड वॉर्डात भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
-डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय