वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांची २३ टक्के पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 02:18 PM2018-11-11T14:18:55+5:302018-11-11T14:19:12+5:30

वाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.

 23% sowing of rabi crops in Washim district! | वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांची २३ टक्के पेरणी!

वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांची २३ टक्के पेरणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.
खरिप हंगामात पिकांना ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत निसर्गाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट आली. माळरान तसेच हलक्या प्रतीच्या जमिनीतून तर लागवडी खर्चही वसूल झाला नसल्याचा दावा शेतकºयांनी केला. आता शेतकºयांची सर्व भिस्त रब्बी पिकांवर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ६२ हजार ३९२ हेक्टरवर हरभºयाची पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत १८ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे.
गहू पिकाचा पेरा २८ हजार ४९७ हेक्टर, रब्बी ज्वारी १३९७ हेक्टर, मका ६९ हेक्टर, सुर्यफुल २२ हेक्टर, इतर तृणधान्य २०१, इतर गळीत धान्य १२४ हेक्टर असे एकूण ९२ हजार ९९६ हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.
परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने कोरडवाहू शेतकरी संभ्रमात असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी हरभºयाला प्रथम पसंती देत असून त्याखालोखाल गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.
तांत्रिक बिघाड, अनियमित वीजपुरवठा, नादुरूस्त विद्युत रोहित्र आदींमुळे सिंचन करण्यातही अडथळे निर्माण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title:  23% sowing of rabi crops in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.