‘एनडीए’ व ‘एनए’च्या परीक्षेसाठी मध्य रेल्वेच्या २३ विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 06:24 PM2020-09-04T18:24:28+5:302020-09-04T18:24:52+5:30

यामध्ये भुसावळ विभागातून १२ विशेष गाड्या धावणार आहेत.

23 special trains of Central Railway for NDA and NA examinations | ‘एनडीए’ व ‘एनए’च्या परीक्षेसाठी मध्य रेल्वेच्या २३ विशेष गाड्या

‘एनडीए’ व ‘एनए’च्या परीक्षेसाठी मध्य रेल्वेच्या २३ विशेष गाड्या

Next

अकोला : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व नौदल अकादमी (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना त्यांच्या सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने ५ व ६ सप्टेंबर रोजी अप व डाउन अशा २३ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भुसावळ विभागातून १२ विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांपैकी आठ गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवास करताना कोविड-१९ साठी देण्यात आलेले सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधककारक असेल. सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आरक्षण खिडकी किंवा आॅनलाइन तिकीट काढता येणार आहे. मेमू गाडी सोडून सर्व गाड्या आरक्षित राहतील. विशेष गाडीचे आरक्षण हे ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. मेमू गाडी ही अनारक्षित राहील. परीक्षार्थिंना अनारक्षित तिकीट काढून प्रवास करावा लागेल, सोबत आपले हॉल तिकीट ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत जाणे व तेथून परत येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

अकोला येथून जाणाऱ्या गाड्या

  1. नाशिक ते नागपूर
  2. जळगाव ते नागपूर
  3. अकोला ते नागपूर (मेमू)
  4. अहमदनगर ते नागपूर
  5. पनवेल ते नागपूर
  6. भुसावळ ते मुंबई
  7. कोल्हापूर ते नागपूर
  8. पुणे ते नागपूर

Web Title: 23 special trains of Central Railway for NDA and NA examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.