कोरोना काळात रुग्णवाहिकेतच २४ शिशुंचा जन्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:47+5:302020-12-15T04:35:47+5:30
हे डॉक्टर देत आहेत सेवा वैद्यकीय अधिकारी डॉ. जुबेर नदीम, डॉ. शाहनवाज चौधरी, डॉ. नागेश जयस्वाल, डॉ. जावेद खान, ...
हे डॉक्टर देत आहेत सेवा
वैद्यकीय अधिकारी डॉ. जुबेर नदीम, डॉ. शाहनवाज चौधरी, डॉ. नागेश जयस्वाल, डॉ. जावेद खान, डॉ. अफरोज, डॉ. इमरान देशमुख, डॉ. गुफरान यांच्यासह पायलट नितीन साठे, सचिन बारोकार, अक्षय देशमुख, अमोल टिकार, धीरज बंड, संतोष ब्रमणकर, सचिन आगाशे, दिनेश गोमासे, विठ्ठल नळकांडे, महेश ढोरे यांच्यासह इतर डॉक्टर व पायलटदेखील रात्रंदिवस सेवा देत आहेत.
गत सात वर्षांची स्थिती
वर्ष-गर्भवतींना रुग्णवाहिकेची सेवा - रुग्णवाहिकेत झालेली प्रसूती
२०१४ - ८३७ - ६१
२०१५ - २४५१ - ८३
२०१६ - ४८४३ - १६०
२०१७ - ४८७३ - १४७
२०१८ - ६९८६ - २२९
२०१९ - ५३८० - ९८
२०२० - २५३० - २४
----------------------------------------------
एकूण - २७,९०० - ८०२
१०८ रुग्णवाहिका गत सात वर्षांपासून निरंतर सेवा देत असून, गर्भवतींनाही प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेत पोहोचवित आहे. कोरोना काळात रुग्णवाहिकेच्या डॉक्टर आणि पायलट यांनी विशेष कामगिरी करत अनेक मातांचे प्राण वाचविले.
- डॉ. मोहम्मद फैजान, जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका, अकोला