नवीन मतदार नोंदणीच्या कामगीरीत २५ मतदारसंघ अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:04 PM2018-10-29T18:04:21+5:302018-10-29T18:05:20+5:30
अकोला : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे नोंदविण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात २७ आॅक्टोबरपर्यत अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे नोंदविण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात २७ आॅक्टोबरपर्यत अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम नवव्या स्थानी तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहीमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमूना अर्ज भरुन घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात येत आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदारांकडून नमूना क्र.६ चा अर्ज भरुन घेण्यात येत आहे. मतदार नोंदणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनामार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नवीन मतदार नोंदणीच्या कामगिरीत राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघ अग्रेसर असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत २७ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. नवीन मतदार नोंदणीच्या कामात राज्यात अग्रेसर असलेल्या २५ विधानसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम नवव्या तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.
मतदार नोंदणीच्या कामात अग्रेसर असे आहेत विधानसभा मतदारसंघ !
नवीन मतदार नोंदणीच्या कामगीरीत राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघ अग्रेसर आहेत. त्यामध्ये धुळे शहर, अमरावती, औरंगाबाद पूर्व, मिरज, उस्मानाबाद, सांगली, परंडा, जालना, अकोला पश्चिम, नालासोपारा, उमरगा (एससी), तासगाव-कवठे महाकाळ, मालेगाव (मध्य),कल्याण पश्चिम, बाळापूर, खानपूर, नांदेड (उत्तर), भोकरदन, बोईसर (एसटी), कल्याण ग्रामीण, शिरुर, सिल्लोड, बीड, तुळजापूर, कोल्हापूर दक्षिण इत्यादी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमूना अर्ज क्र.६ भरुन घेणे व ‘डाटा एन्ट्री ’ करण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला पश्चिम नवव्यास्थानी तर बाळापूर विधानसभा मतदारसंघ पंधराव्यास्थानी आहे.
-वैशाली देवकर
उपजिल्हाधिकारी (निवडणूक), अकोला.