उड्डाण पुलासाठी बजेटमध्ये २५ कोटीची तरतूद

By admin | Published: July 1, 2014 10:55 PM2014-07-01T22:55:58+5:302014-07-02T00:32:01+5:30

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वरील उड्डानपूल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलासाठी येत्या बजेटमध्ये २५ कोटी रु. ची तरतुद

25 crores budget for the flyovers | उड्डाण पुलासाठी बजेटमध्ये २५ कोटीची तरतूद

उड्डाण पुलासाठी बजेटमध्ये २५ कोटीची तरतूद

Next

नांदुरा : नांदुरा ते जळगाव रोडवरील रेल्वे गेट वर प्रस्तावित नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वरील विश्रामगृह ते हनुमान मुर्ती पर्यंंत उड्डानपूल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलासाठी येत्या बजेटमध्ये २५ कोटी रु. ची तरतुद करण्याचे आदेश भूतल परिवहन तथा ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार चैनसुख संचेती यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकार्‍यांना दिल्याने प्रस्तावित रेल्वे उड्डान पुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे.
नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील रेल्वे गेट रेल्वेची वाहतूक वाढल्याने दिवसभरात अनेकवेळा १५ ते २0 मिनीट रेल्वेगेट बंद राहते. त्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूने शेकडो प्रवाशी ताटकळत उभे असतात. वाहतूकीचाही खोळंबा होतो. त्याकरिता नांदुरा शहरतील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील विश्रामगृह ते हनुमान मुर्ती पर्यंंत उड्डान पुल व त्यावरुन टी आकाराच्या रेल्वे उड्डान पुलाचे काम होणे गरजेचे आहे. आमदार चैनसुख संचेती यांनी वेळोवेळी याबाबत विधान भवनात सदर रेल्वे गेटवर उड्डानपुलाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबत शासनाला विनंती केली होती. १८ जून रोजी आ.चैनसुख संचेती व शिष्ट मंडळाने भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना आदेश देत येणार्‍या बजेटमध्ये या रेल्वे उड्डान पुलासाठी २५ कोटी रु. निधीची तरतुद करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आ. संचेती यांनी दिली आहे.

Web Title: 25 crores budget for the flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.