अडीच लाख क्विंटल तुरीची आवक

By admin | Published: March 20, 2017 02:43 AM2017-03-20T02:43:48+5:302017-03-20T02:43:48+5:30

अकोला जिल्ह्यात विक्रमी उत्पादन; बाजार समितीसह नाफेड केंद्रावर खरेदी.

2.5 lakh quintals per acre | अडीच लाख क्विंटल तुरीची आवक

अडीच लाख क्विंटल तुरीची आवक

Next

अकोला, दि. १९- कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर यंदा अडीच लाखांवर तुरीची आवक झाली आहे. आणखी ४0 हजार क्विंटल तूर बाजारात येण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीची झालेली आवक यंदा दुप्पट आहे.
हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १ लाख क्विंटल तुरीची तर नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर १ लाख ४0 हजार क्विंटल तुरीची आवक झाली. गतवर्षी बाजार समितीमध्ये दीड लाख क्विंटल तुरीची आवक झाली होती. गतवर्षी तुरीची आवक कमी झाल्यामुळे तुरीला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. त्यामुळे तुरीची डाळही प्रचंड महागली होती; परंतु यंदा मात्र तुरीची आवक तिपटीने वाढली असल्याने, यंदा तुरीचे भाव पाच हजारापर्यंत स्थिरावले आहेत. त्यातही तुरीचे ग्रेडेशन करण्यात आहे. दर्जेदार तुरीला चांगला भाव मिळत आहे. आतापर्यंत बाजार समिती आणि नाफेडच्या केंद्रावर अडीच लाखांवर तुरीची आवक झाली आहे. आणखी तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज नाफेडच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
बाजार समितीमधील व्यापार्‍यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५00 रुपये अधिक भाव मिळत असल्याने, शेतकरी नाफेडला पसंती देत आहेत; परंतु ज्या शेतकर्‍याला पैशांची निकड असल्याने, ते आपला माल व्यापार्‍याकडे विकत आहेत. पैसे रोख किंवा धनादेशाने मिळत असल्याने, काही शेतकरी खासगी व्यापार्‍यांना तूर विकत आहेत. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १५ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर दोन ते तीन हजार क्विंटल तुरी खरेदी होत असल्याने, शेकडो शेतकर्‍यांना मापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नाफेड केंद्राबाहेर शेतकर्‍यांच्या रांगा कायम आहेत. बाजार समितीच्या आवारात ४00 वर ट्रॅक्टर, ट्रॉली उभ्या आहेत. शेतकर्‍यांची गर्दी वाढत असल्याने, नाफेडच्या खरेदीवर परिणाम होत आहे.
शेतकर्‍यांना करावा लागत आहे मुक्काम
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर तूर घेऊन आलेल्या शेतकर्‍यांना गर्दीमुळे मुक्काम करावा लागत आहे. एवढेच नाहीतर मालवाहू वाहन किंवा ट्रॅक्टर मालकाला अतिरिक्त भाडे द्यावे लागत आहे. बाजार समितीच्या आवारात तुरीने भरलेल्या ट्रॉली उभ्या असल्याने, सात ते आठ दिवस शेतकर्‍यांना मापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

Web Title: 2.5 lakh quintals per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.