जिल्ह्यातील २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र
By admin | Published: April 7, 2017 01:03 AM2017-04-07T01:03:02+5:302017-04-07T01:03:02+5:30
सन २०१६-१७ करिता जिल्ह्यातील १४ व सन २०१५-१६ करिता ११ असे एकूण २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ अंतर्गत सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०१६-१७ करिता जिल्ह्यातील १४ व सन २०१५-१६ करिता ११ असे एकूण २५ शालेय खेळाडू शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यात आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ११,२५० रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ८,९५० रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ६,७५० रुपये आणि सहभागी खेळाडूला ३,७५० रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंनी आपले सहभाग किंवा प्रावीण्य प्राप्त केलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडूचे बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स १० एप्रिल पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे जमा करावी, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी दिली.
सन २०१६-१७ चे पात्र खेळाडू
स्वरू प राजेंद्र इंगळे, ओमकुमार विलास सोळंके, आर्यन भाणवडिया, राज मंगल गवई, तेजल धर्मेंद्र ठाकूर, अक्षय सुनील दांदळे, देवांश अशोककुमार मिश्रा, प्रतीक सुभाष राठोड, अनीश शामवेलु जाधव, साक्षी अरू ण गीते, इशा अजय सारडा, निशांत संजय घोगरे, आदित्य गजानन चौधरी, शिवाजी नागोराव गेडाम.
सन २०१५-१६ चे पात्र खेळाडू
संकेत सुधाकर तेलगोटे, तेजस उदय हातवळणे, तन्वी सुधाकर नानोटे, निखिल कैलास चव्हाण, पूनम नारायण कैथवास, मो.राहिल मो.रफिक, सचिन साहेबराव चव्हाण, दिया कैलास बचे, साक्षी उमेश गायधनी, मोनिका किसन बावणे, संकेत मुकूंद देशमुख़.