शहरात २५० जण काेराेना पाॅझिटिव्ह; नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:45+5:302021-03-20T04:17:45+5:30
पूर्व, दक्षिण झाेन दुर्लक्षित का? शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक ...
पूर्व, दक्षिण झाेन दुर्लक्षित का?
शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. या दाेन्ही झाेनकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारीदेखील पूर्व झोनमध्ये काेराेनाचे १२८ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ४०, उत्तर झोनमध्ये २८ व दक्षिण झोनमध्ये ५४ असे एकूण २५० रुग्ण आढळून आले आहेत.
१,८२७ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्रे सुरू केली असता शुक्रवारी तब्बल १,८२७ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ७२५ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच १,१०२ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.