शहरात २५१ जणांना कोरोनाची लागण; नागरिक निर्धास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:17+5:302021-05-05T04:29:17+5:30

अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी शहरातील तब्बल २५१ जणांना काेराेनाची लागण ...

251 people infected with corona in the city; Citizen Indifference | शहरात २५१ जणांना कोरोनाची लागण; नागरिक निर्धास्त

शहरात २५१ जणांना कोरोनाची लागण; नागरिक निर्धास्त

Next

अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी शहरातील तब्बल २५१ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. तसा अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला प्राप्त झाला. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाचा कहर वाढत चालला असून, नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. अशास्थितीत काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या १६१४ जणांनी चाचणीसाठी गर्दी केली होती.

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश्य लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिक गर्दी करीत आहेत. शासनाने लागू केलेले कडक निर्बंध झुगारून देत नागरिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्याचे परिणाम सर्वांना भाेगावे लागत असून, सोमवारी शहरातील २५१ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

पूर्व व दक्षिण झाेन आटोक्यात येईना!

शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ८२ रुग्ण आढळून आले तसेच पश्चिम झोनमध्ये ५३, उत्तर झोनमध्ये ३४ व दक्षिण झोनमध्ये ८२ असे एकूण २५१ रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व व दक्षिण झोनमधील रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.

चाचणी केंद्रांत नियम पायदळी

काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिक चाचणीसाठी धावाधाव करीत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू केले. याठिकाणी सोमवारी १६१४ जणांनी चाचणी केली. यामध्ये ५२४ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली तसेच १०९० जणांनी रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणी केली आहे.

Web Title: 251 people infected with corona in the city; Citizen Indifference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.