कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोला जिल्ह्यातून २.५७ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:43 IST2019-08-28T14:43:38+5:302019-08-28T14:43:41+5:30
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातून २ लाख ५७ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अकोला जिल्ह्यातून २.५७ लाख !
अकोला : राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातून २ लाख ५७ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे. उपलब्ध मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गत १० ते २६ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्था आणि संघटनांकडून मदतनिधीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातून २ लाख ५७ हजार रुपयांच्या मदतनिधीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. उपलब्ध मदतनिधीचे धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी मदत देणाऱ्या जिल्ह्यातील संबंधित व्यक्ती, संस्था व संघटनांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अभिनंदन प्रमाणपत्र देण्यात आले.