चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल केला परत; अकोलामधील घटना

By सचिन राऊत | Published: September 30, 2022 06:13 PM2022-09-30T18:13:36+5:302022-09-30T19:25:21+5:30

जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानीक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशनच्या पथकांनी चोरटयांना ताब्यात घेउन जप्त केला आहे.

26 lakh worth of stolen items returned; incident in Akola | चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल केला परत; अकोलामधील घटना

चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल केला परत; अकोलामधील घटना

googlenewsNext

अकोला : जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या चोरी तसेच विविध घटनेतील रोखरक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतुन विशेष उपक्रम राबवून हा मुद्देमाल संबधित फीर्यादींना शुक्रवारी परत करण्यात आला आहे. जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फीर्यादींना तब्बल २६ लाख १५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानीक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशनच्या पथकांनी चोरटयांना ताब्यात घेउन जप्त केला आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजीत करून हा मुद्देमाल संबधित फीर्यांदीना परत केला. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या स्तरावर कार्यक्रम आयोजीत करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

यामध्ये ७ लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचे १३ चोरीस गेलेली वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच ९ लाख २९ हजार २९८ रुपयांचे ६२ मोबाईल परत करण्यात आले आहे. २ लाख ३७ हजार ९२ रुपयांचे सोने व चांदीचे दागीने फीर्यादींना परत करण्यात आले आहे. यासोबतच ६ लाख ७९ हजार २२५ रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकून २६ लाख ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो परत करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 26 lakh worth of stolen items returned; incident in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.