राष्ट्रीय स्तरावरील ‘एनटीएस’ परीक्षेसाठी २६ विद्यार्थ्यांची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:07 PM2019-04-07T13:07:39+5:302019-04-07T13:07:44+5:30

अकोला: राज्य पातळीवर झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून, या परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्याने राज्य स्तरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे.

26 students selected for National Level 'NTS' examination! | राष्ट्रीय स्तरावरील ‘एनटीएस’ परीक्षेसाठी २६ विद्यार्थ्यांची निवड!

राष्ट्रीय स्तरावरील ‘एनटीएस’ परीक्षेसाठी २६ विद्यार्थ्यांची निवड!

Next

अकोला: राज्य पातळीवर झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून, या परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्याने राज्य स्तरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. रसिका दिनेश मल हिने सर्वसाधारण गटातून १९१.७३ गुण प्राप्त करीत राज्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ बृगेश मेहूल वोरा याने १८२.४ गुण मिळवून जिल्ह्यात मुलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला तर अथर्व देवेंद्र टाले याने १७९.३६ गुण मिळवित द्वितीय स्थान पटकावले आहे.
राज्य स्तरावर ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड करण्यात येते. आता राष्ट्रीय स्तरावर १६ जून रोजी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा होणार आहे. राज्यातून या परीक्षेला ८६ हजार २८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी केवळ ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांचा समावेश असून, रसिका मल हिने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवित अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यासोबतच तेजस प्रभाकर मोहाळे यांनी १७९.२३ गुण, राधिका राजकुमार भांगडिया हिने १७७.३२, ईशा राजाभाऊ पाथ्रीकर हिने १७६.३८, प्राची तरुण राठी हिने १७५.२८, पार्थ शैलेश नावकार याने १७४.३४, रसिका ज्ञानेश्वर कपले हिने १७३.११, तुषार भारत कराळे याने १७२.२२, श्रीकर अतुल बंग याने १७२.१९, अनिकेत सुनील इंगळे १७१.२४, तन्वी संतोष गहूकर हिने १७0.१५, पूर्वा परीक्षित सारडा हिने १७0.११, सुमित श्रीकृष्ण धुळे याने १७0.0७, प्रियांशी संजय खेतान हिने १७0.0५, कीर्ती चंद्रशेखर सावरकर हिने १६७.१८, श्रुती अनंत लव्हाळे हिने १६५.९४, विराज राजीव जगताप याने १६१.९७, प्रज्वल जगन्नाथ घोगले १६१.७७, प्रचेता प्रकाश मुकुंद हिने १६0.९५, पार्थ दीपक वर्मा याने १४४.४१ तर खुशी गणेशकुमार गोंडाने हिने १६४.९२, उत्कर्ष शिवम कमल याने १६0.८४, हर्षल अमर गजभिये १५३.८५, कुणाल नाजूकराव वानखडे याने १४९.४७ गुण मिळविले. या सर्व २६ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे व उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: 26 students selected for National Level 'NTS' examination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.