मनपा क्षेत्रात २६१ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:42+5:302021-05-14T04:18:42+5:30
अकाेला: महापालिका क्षेत्रात २६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरीही चाचणीमध्ये घसरण आल्याचे दिसून ...
अकाेला: महापालिका क्षेत्रात २६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरीही चाचणीमध्ये घसरण आल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी केवळ ९३७ जणांनी चाचणी केली असून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
गुरुवारी शहरातील २६१ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़ यात पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल १०२ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये १७ उत्तर झोनमध्ये २७ व दक्षिण झोनमध्ये चक्क १०५ असे एकूण २६१ रुग्ण आढळून आले आहेत.
९३७ जणांनी केली चाचणी
शहरात घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाच्या चाचणी केंद्रांत गुरुवारी ९३७ जणांनी चाचणी केली. यामध्ये ३२१ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ६१६ जणांनी रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.